*एरंडोल महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*

प्रतिनिधी एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. दादासाहेब अमित पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नरेंद्र गायकवाड यांनी छत्रपती शाहू महाराज यांची माहिती सांगताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी बांधलेले राधानगरी धरण, कोल्हापूर मध्ये सुरू केलेली चहाची लागवड, गुळाची बाजारपेठ, शाहू मिल याविषयी माहिती दिली. तसेच अस्पृश्यांना दिलेल्या वकिलीची संधी, वसतिगृहे, सक्तीचे आणि मोफत शिक्षण, अस्पृश्यता कमी करण्यासाठी गंगाराम कांबळे यांना स्वखर्चाने उघडून दिलेले उपहारगृह, कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांसाठी नोकरीस दिलेले 50% आरक्षण महात्मा फुलेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापन केलेली सत्यशोधक समाजाची शाखा, आंतरजातीय विवाहास दिलेले प्रोत्साहन अशा विविध गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नरेंद्र गायकवाड, कुलसचिव श्री. सोमनाथ बोरसे , प्रा.ए.टी. चिमकर, डॉ. एन.एस. तायडे, डॉ.राम वानखेडे, डॉ.हेमंत पाटील, डॉ. बालाजी पवार, डॉ. मीना काळे, प्रा.डॉ.सोपान साळुंखे (विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा.सागर विसपुते, प्रा.डॉ.उमेश गवई, प्रा. उमेश सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गाढे यांनी केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सविता पाटील व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.योगेश येंडाईत यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते