*डि.डी.एस.पी महाविद्यालयातर्फे विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला संस्थाध्यक्ष अमित पाटील यांचा वाढदिवस……..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डि.डी.एस.पी.महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तगट तपासणी शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर, वृक्षलागवड, इत्यादी विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविण्यात आले.यावेळी १५० विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले.मोफत आरोग्य तपासणीचा १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.तर १०२ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नेत्र तपासणी करवून घेतली.यावेळी संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.संस्थाध्यक्ष अमित पाटील यांना शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले.
विविध शिबिरांसाठी हर्षदा क्लिनिक लॅब, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना,महालॅब्स, युवती सभा मंच, ग्रामीण रूग्णालय, अश्विनीकुमार नेत्रालय यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ अरविंद बडगुजर, डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील,गोरख चौधरी, विरेंद्र पाटील,आसिफ मुजावर,चेतन गुरव,प्रतिभा निकम, डॉ.प्रतिक भावसार, डॉ.ईश्वर महाजन, रविंद्र पाटील,रूपाली रावतोळे, डॉ.स्वाती शेलार, कैलास महाजन, कुंदन ठाकूर, पंकज महाजन, प्रा.शरद महाजन, प्रा.नितीन पाटील प्राध्यापक वृंद व कर्मचारी,प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.विजय गाढे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सविता पाटील यांनी केले.डाॅ.रेखा साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.