एरंडोल महाविद्यालयातील आर्थिक दुर्बल घटक योजना,कमवा व शिका योजनेतून 39 विद्यार्थ्यांना आर्थिक आदर्श मदत.

प्रतिनिधी – एरंडोल येथील य.च.शि.प्र. मंडळ,एरंडोल, दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, शैक्षणिक वर्ष २०२४-२५, मधील कमवा व शिका योजना आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचे धनादेश देण्यात आले.
कमवा व शिका योजनेतून महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ६ हजार ४० रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
तर आर्थिक दुर्बल योजना या योजनेतून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकूण १ लाख १३ हजार ५०० रुपयाची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत वरीष्ठ विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी, आणि आर्थिक दुर्बल योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात मदत करण्यासाठी राबविण्यात येतात. या विविध योजनांमध्ये दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदवला व या योजना विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनीं यांच्यासाठी राबवल्या.
या योजनेचा लाभ अशा विद्यार्थ्यांना मिळतो,ज्यांचे पालक मयत आहेत, कोरोना काळात मृत्यू पावले आहेत, ज्यांच्या पालकांनी शेतकरी आत्महत्या केली आहे, जे पालक दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक आहेत, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तसेच ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी विद्यापीठाकडून विविध निकष लावून विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
तथापि विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयातील एकूण कमवा व शिकाय योजनेसाठी २० विद्यार्थी व आर्थिक दुर्बल योजनेसाठी २० विद्यार्थी – विद्यार्थिनीची शिफारस मान्य करुन, कमवा व शिका योजनेसाठी एकूण दोन लाख सहा हजार चाळीस रुपये व आर्थिक दुर्बल योजनेसाठी एकूण एक लाख तेरा हजार पाचशे रुपये असे एकूण तीन लाख एकोणीस पाचशे चाळीस एवढी रक्कम मंजूर केली.
या रकमेचे धनादेश महाविद्यालयाचे अध्यक्ष, दादासाहेब, अमित पाटील, प्राचार्य डॉ.ऐ.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ.ऐ.ऐ बडगुजर,कुलसचिव श्री.एस.एस. बोरसे, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख, डॉ.एस.एम. साळुंखे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ.एस.व्ही.शेलार व डॉ.यू.पी. गवई यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत व महाविद्यालयाकडून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे, क्रीडासंचालक प्रा.क.जे. वाघ, प्रा.ए.टी.चिमकर, डॉ. एन.एस. तायडे, डॉ.आर.एस.वानखेडे, डॉ.बि.व्ही. पवार, डॉ.एस.एल. कोतकर, प्रा. योगेश येंडाईत, डॉ.अतुल पाटील व विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. यासाठी महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.