*एरंडोलचे निंबा कुंभार भारत गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित*

प्रतिनिधी – एरंडोल पुणे येथील भारत गौरव सन्मान वितरण समितीतर्फे दरवर्षी देण्यात येणारा भारत गौरव सन्मान पुरस्कार एरंडोल येथील गुरूकूल कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त गटसचिव निंबा पुंडलिक कुंभार यांना देण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर पुरस्कार निंबा कुंभार करीत असलेल्या राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी आणि उल्लेखनिय कार्याच्या गौरवार्थ देण्यात आला आहे. पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित रंग श्रावणाचा…. गौरव समाजसेवेचा…. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर मुक्ताई चित्रपटातील अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी निंबा कुंभार यांनी लिहिलेले जीवन प्रवास या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. निंबा कुंभार यांना भारत गौरव सन्मान पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचे सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप, सचिव विनायक कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, राजेश पाटील, विलास जगताप, अॅड. दिनकर पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.