प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूलच्या अद्वैत मनोज मोरे याचे बुद्धिबळ स्पर्धेत यश.

प्रतिनिधी एरंडोल-येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूलचा विद्यार्थी अद्वैत
मनोज मोरे या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश प्राप्त
केले.अद्वैत मोरे याची पुढील फेरीसाठी पात्र झाला असून त्याची
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत
तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह
इंग्लिश मेडियम स्कूलचा सातवीच्या वर्गातील विद्यार्थी अद्वैत मोरे याने
यश प्राप्त केले.संस्थेचे अध्यक्ष प्रसाद काबरे,उपाध्यक्षा पियुषा काबरे
यांनी अद्वैत मोरे याचा सत्कार केला.यावेळी अध्यक्ष प्रसाद काबरे यांनी
संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी साहित्य उपलब्ध करून
देण्यात आले असून तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करीत असल्याचे
सांगितले.विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे
आवाहन त्यांनी केले.उपाध्यक्षा पियुषा काबरे यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये
सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे
सांगितले.शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणा-या विविध
उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमास मुख्याध्यापिका स्मिता
घोरमोडे,शालेय अधीक्षक प्रशांत ढोले,क्रीडा शिक्षक आनंद जाधव यांचेसह
शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.शाळेतर्फे
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी देण्यात येणा-या प्रोत्साहनाबद्दल
पालकांनी समाधान व्यक्त केले.