*दोन दुचाकींचा समोरासमोरून भीषण अपघात १ ठार …….!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे म्हसावद रोडवरील निखिल पेट्रोल पंपाच्या पुढे एका दुचाकीला समोरून एरंडोल कडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने जोरात ठोस मारल्याने भीषण अपघात झाला.त्यात दुचाकी चालक संजय माणिक पवार,वय ६० वर्षे,रा.आसनखेडा ता.पाचोरा हे ठार झाले.सदर दुर्घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की संजय माणिक पवार, वय अंदाजे ६० वर्षे,रा.आसनखेडा ता.पाचोरा हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र.एम एच १९/डि ए ७७०८ ने एरंडोलकडे जात असतांना समोरून एरंडोलकडून येणाऱ्या दुचाकी क्र. एम एच १९/इ इ ३७७२ वरील चालक संजय नामदेव कोळी, रा.म्हसवे ता.पारोळा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने व हयगईने चालवून संजय माणीक पवार हे चालवीत असलेल्या दुचाकीस समोरून ठोस मारल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण रूग्णालय, एरंडोल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या भीषण अपघातास जबाबदार असलेला दुचाकी चालक संजय नामदेव कोळी याचे विरूद्ध शामकांत वाघ यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.संजय कोळी व बाळा कोळी हे दोन्ही रा .म्हसवे ता.पारोळा जखमी असून त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.