क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
जवखेडे बुद्रुक येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या.

प्रतिनिधी एरंडोल: तालुक्यातील जवखेडे बुद्रुक येथे सुनील भारत पवार वय 30 वर्षे या शेतमजुराने विहिरीत दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत तरुण हा मूळ राहणारा लोन तालुका भडगाव येथील असून त्याचा हल्ली मुक्काम जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल येथे होता.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला आकस्मान मृत्यूची नोंद करण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक विकास देशमुख बापू पाटील अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.