श्री शिवछत्रपती वाटिकेत प्रांताधिकारी गायकवाड यांच्या संकल्पनेतून चारशे वृक्षांची लागवड.

प्रतिनिधी – एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून श्री
शिवराज्यभिषेकास मागील वर्षी ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महसूल विभाग व
वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय गोदामाजवळ असलेल्या ओसाड
जमिनीवर विविध जातीच्या सुमारे चारशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.वृक्ष लागवड करण्यात आलेल्या ठिकाणाचे ‘श्री शिवछत्रपती वाटिका’ असे नामकरण करण्यात आले आहे.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व कर्मचारी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे योग्य पद्धतीने संवर्धन करीत असल्यामुळे
सर्व वृक्ष सुस्थितीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकास मागील वर्षी तीनशे
पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या
संकल्पनेतून म्हसावद रस्त्यावरील शासकीय गोदाम परिसरात असलेल्या ओसाड
जमिनीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांचे उपस्थितीतचिंच,निंब,सिसम,जांभूळ,सीताफळ,वड,पिंपळ.कडुलिंब यांसारख्य सुमारे चारशे विविध देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली
होती.तत्कालीन तहसीलदार सुचिता चव्हाण,वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे
यांचेसह पुरवठा विभाग,वनविभागाने वृक्षारोपणासाठी सहकार्य केले
होते.वृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन करण्याचे नियोजन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी कर्मचा-यांच्या सहकार्याने करून आदर्श उपक्रम राबवला.वृक्षारोपण करण्यात आलेल्या संपूर्ण परिसराला काटेरी कुंपण करून जनावरे वृक्षांचे नुकसान करणार नाही याची दक्षता
घेतली.सर्व वृक्षांना वेळेवर पाणी उपलब्ध व्हावेत यासाठी वनविभागाकडून ठिबक नळ्या घेवून नियमितपणे पाण्याची सोय केली.संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.सुटीच्या
दिवशी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड कर्मचा-यांसह वाटिकेत जाऊन वृक्षांची पाहणी करून त्यांची देखभाल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी करीत होते.सेतूसुविधा केंद्रचालक पिंटू राजपूत यांचेवर त्यांनी
वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपवली.वृक्षारोपण करून सुमारे एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून सद्यस्थितीत वाटिकेतील सर्व वृक्ष सुस्थितीत
असून त्यांची जोमाने वाढ होत आहे.रविवारी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी वाटीकेची पाहणी करून दैनिक तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी प्रा.सुधीर शिरसाठ दै.’सकाळ’चे तालुका प्रतिनिधी आल्हाद जोशी, यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.श्री शिवछत्रपती वाटिकेत वृक्षांच्या आजूबाजूला वाढलेले गवत
काढून स्वच्छता करण्याची सुचना त्यांनी वाटीकेची जबाबदारी सांभाळणा-या पिंटू राजपूत व त्यांच्या सहका-यांना केली.कामाचे योग्य नियोजन करून
त्याची प्रामाणिकपणे प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यास नियोजित केलेले
उद्दिष्ट्य निच्छितपणे पूर्ण करता येते हे कृतीतून प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी सिद्ध केले आहे.’श्री शिवछत्रपती वाटिका’
परिसराला एक वर्षानंतर सर्वत्र हिरवाईचे स्वरूप प्राप्त होणार असून
त्याचे नियोजन महसूल प्रशासनाने केले आहे.दरम्यान प्रांताधिकारी
मनीषकुमार गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वच
स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.