जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक
के.डी. पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींची बुध्दिबळ स्पर्धेत जिल्हास्तरासाठी निवड.

प्रतिनिधी एरंडोल – येथील श्रीमती. के. डी. पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमधील इ.८ वीच्या विद्यार्थिनी निशिका ज्ञानेश्वर महाजन व कामिनी नितीन दुसे यांनी नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोन्हीही विद्यार्थिनी तालुक्यातून विजयी ठरल्या असून त्यांची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थीनिच्या या अतुलनीय यशामुळे शाळेच्या नावलौकिक वाढला आहे. अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य दीनानाथ पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.