जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
महात्मा फुले युवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश महाजन यांची निवड

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील जवखेडे बु येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश निंबा महाजन यांची बीड येथील महात्मा फुले युवा दलाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपरोक्त निवड बीड येथील संस्थेचे संस्थापक एडवोकेट सतीश शिंदे यांनी केली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या संस्थेच्या माध्यमातून लोकाभिमुख व सामाजिक काम करण्याचा मानस सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाजन यांनी व्यक्त केला आहे.