जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
कवियत्री मंगला रोकडे यांचा साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान..

प्रतिनिधी, एरंडोल : येथील ज्येष्ठ कवयित्री आणि निसर्गसखी मंगला मधुकर रोकडे यांना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्यरत्न जीवन गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार २४ ऑगस्ट रोजी स्वराज्य क्रांती सेवा संघ महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून डायमंड मीडिया डिजिटल ग्रुपतर्फे प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार कवयित्री रोकडे यांना ऑनलाईन माध्यमातून डायमंड ग्रुपचे मुख्य संपादक अंकुश कुमावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
मंगला रोकडे यांना यापूर्वीही अनेक साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नवीन सन्मानामुळे धुळे, जळगाव आणि एरंडोल परिसरातून त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.