राजधर महाजन यांना ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर……….!

प्रतिनिधी एरंडोल – येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांना माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानमाता सेवाभावी संस्था पुणे कडून मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
राजधर महाजन यांनी एरंडोल तालुक्यात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून अनेक सामाजिक बदल घडवले आहेत. तसेच, पत्रकारिता आणि इतर सामाजिक संस्थांमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान दिला जात आहे.असे ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी निवड पत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल एरंडोल तालुका पत्रकार संघ, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि एरंडोल तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.