एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील श्री. साई गजानन मंदिर संस्थान,योगेश्वर नागरी पतसंस्था,आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,नामदार गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पाळधी व संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.साई गजानन मंदिर संस्थान येथे दि.१७ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराला येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधार कार्ड,रेशन कार्ड च्या झेरॉक्स प्रति,मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांची फाईल आणावी,उपाशी पोटी यावे,रुग्णाला ऑपरेशन करण्यास सांगितले तर तशा तयारीत पनवेल जाण्याच्या तयारीत यावे,जाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे,हॉस्पिटल मध्ये जेवणाची सोय राहील,कुटुंबातील कोणाचाही एक मोबाईल नंबर जवळ ठेवावा,डोळ्याच्या संदर्भात गंभीर समस्या व शस्त्रक्रियेच्या रुग्णांनीही शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.