एरंडोल येथे मुलीने दिला पित्याला अग्नीडाग….!
प्रतिनिधी एरंडोल – येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त कमिशन ऑफिसर प्रमोद शुक्ल यांचे वार्धक्याने निधन झाले.शनिवारी दुपारी कु.राणी व कु.आकांक्षा या मुलीने त्यांना अग्नीडाग दिला.यावेळी आजी माजी सैनिंकांतर्फे मानवंदना देण्यात आली.
प्रमोद शुक्ल ( बडगुजर ) यांनी २५ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले.घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी सैन्यदलातील ज्युनियर कमिशन ऑफिसर पर्यंत मानाचे पद मिळवले.त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, पत्रकार प्रविण महाजन, ईश्वर बिऱ्हाडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.याप्रसंगी डॉ.राहुल पाटील, सुनील चौधरी,निंबा बडगुजर, मनोज बडगुजर,अमोल बडगुजर, अशोक शुक्ल, शांताराम शुक्ल,रतन शुक्ल, विनोद, शुक्ल,बाळकृष्ण पाटील, रघुनाथ सुतार आदी मान्यवर, सैनिक बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.