अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराचे एन्काउंटर करा – राष्ट्रीय भोई एकता संघाची मागणी.

प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रीय भोई एकता संघातर्फे अकोला शहरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला शोधून त्याचा एन्काउंटर करावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असून तसे निवेदन एरंडोल तहसीलदार प्रदिप पाटील यांना देण्यात आले आहे.
निवेदनात अकोला येथील गुलजार पुरा भागात गरीब कुटुंबात राहणारी १३ वर्षीय मुलगी एकटी घरी होती.तिच्या घरातील लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते.याचाच फायदा घेत संशयित आरोपी तोहीत समीर याने तिच्यावर अत्याचार केला. तोहीत हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याची गुलजार पुरा भागात दहशत आहे.यापूर्वी देखील अनेक गुन्ह्यात सदर आरोपी जेल मध्ये जाऊन आला असल्याचे म्हटले असून सदर आरोपीला शोधून पोलिसांना त्याचा एन्काउंटर करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय भोई एकता संघाचे अध्यक्ष अशोक मोरे,माजी नगरसेवक शेनफडू वाल्डे,युवा मंचचे अध्यक्ष नरेश भाई,सामाजिक कार्यकर्ते उखर्डु वाल्डे,पी. डी.मोरे,गोविंदा वाल्डे,दिलीप वाल्डे,किशोर भाई,विलास वाल्डे व समाज बांधव उपस्थित होते.