महाराष्ट्र भूषण उमेश महाजन यांना क्रांतीसुर्य समाजरत्न पुरस्कार.

प्रतिनिधी – एरंडोल येथील आरोग्य सेवक महाराष्ट्र भूषण उमेश महाजन यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशनच्या मदतीने आज पर्यंत कॅन्सरच्या व किडनीच्या अनेक रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. उमेश महाजन यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील याच समाजकार्याची दखल घेत क्रांतीसुर्य शेती व शिक्षण संस्थेतर्फे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते उमेश महाजन यांना क्रांतीसुर्य समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिर्डी येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे अध्यक्ष खंडू अण्णा सातपुते तसेच सचिव गोरक्ष भवर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आणि माफक दरात उपचार मिळावेत यासाठी उमेश महाजन प्रयत्नशील आहेत, त्यांच्या याच निस्वार्थ सेवाभावामुळे यापूर्वी देखील महाजन यांना महाराष्ट्र भूषण, समाज भूषण, शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव व असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.