एरंडोल-विखरण-रिंगणगाव मंडळ आणि कासोदा-उत्राण-तळई मंडळची संयुक्त कार्यशाळा पार पडली.

प्रतिनिधी – एरंडोल येथील शासकीय विश्रामगृह येथे नामदार गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे खासदार स्मिता वाघ, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल-विखरण मंडळ आणि कासोदा-उत्राण मंडळाची संयुक्त 17 नोव्हेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवाडा आयोजित करण्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष एस. आर.पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष ऋषिकेश पाटील, जिल्हा सदस्य व माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, एरंडोल विखरण-रिंगणगाव मंडळ अध्यक्ष योगेश महाजन (देवरे) व कासोदा- उत्राण- तळई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,गजू महाजन,माजी नगरसेवक शामकांत ठाकूर, प्रमोद महाजन व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.