अपघातक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगराध्यक्षांचा अपघात नसून घातपात झाल्याचे उघड.
पत्नीचा संशय ठरला खरा.
तिघांना केली अटक.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन दि.१२ जून रोजी आपल्या पोल्ट्रीफार्मच्या भराव साठी भालगाव येथे मुरुम बघण्यासाठी गेले असता त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते परंतु त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी हा अपघात नसून घातपात झाल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल केली होती.त्यानुषंगाने त्यांचा संशय खरा ठरला असून स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने तिन संशयितांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


        याबाबत स्थानिक गुन्हे शाखे कडून मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन दि.१२ जून रोजी आपल्या पोल्ट्री फार्म च्या भराव साठी भालगाव येथे मुरुम बघण्यासाठी गेले असता त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते परंतु त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी हा अपघात नसून घातपात झाल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या कडे वर्ग केला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव संदिप पाटील यांनी पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली व सदर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा व त्याठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यांचा बारकाई ने अभ्यास करून त्याठिकाणाचे सी.सी.टी. व्हि.फुटेज तपासण्याचे काम सुरु केले परंतु घटनेच्या दोन दिवस आधी या परिसरात जोरदार वादळी पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी विद्युत खांब कोसळले होते.त्यामुळे सी.सी.टी. व्ही.फुटेज प्राप्त करण्यास अडचणी निर्माण होत होत्या.पो.हवा.प्रवीण मांडोळे व राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावर तब्बल ८ तास परीक्षण करुन नमूद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन सदरचा गुन्हा अपघात नसून घातपात असल्याचे उघडकीस आणले व याप्रसंगी एरंडोल येथील उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०),शुभम कैलास महाजन(१९),पवन कैलास महाजन (२०) यांना शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून यातील आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने सदर गुन्हा पूर्व वैमन्यास्यातून केला असल्याचे सांगितले आहे तर गुन्हा करताना वापरण्यात आलेली महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याच्या कडून जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करून अजून कोणाचा या गुन्ह्यात आहे का हा तपास केला जात आहे.


       सदर कार्यवाही अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव संदिप पाटील,पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,पो. हवा.सोपान गोरे,हिरालाल पाटील,संदीप पाटील, प्रविण  मांडोळे,अक्रम शेख,प्रवीण भालेराव,रवी कापडणे,राहुल कोळी,जितेंद्र पाटील,भूषण पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पो.शी.प्रशांत पाटील एरंडोल यांच्या पथकाने केली.
      दरम्यान एरंडोल शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आरोपींना एरंडोल कोर्टात हजर केले असता न्यायाधीश बी.ए.तळेकर यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button