बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार.

प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल मार्फत चालवलेल्या जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक भरत शिरसाठ यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.भरत शिरसाठ यांनी या अगोदर नाशिक विभाग इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून सुद्धा काम केले आहे. इलिस आणि चेस इंग्रजी विषय प्रोजेक्ट मध्ये जळगाव जिल्हा मेंटॉर आणि एमइआर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. इंडिया बांगलादेश टेलिकोलॅबोरेशन प्रोजेक्टचे जळगाव जिल्ह्याचे ते समन्वयक होते. एससीईआरटी च्या वरिष्ठ व निवड श्रेणी मार्गदर्शिका लेखन समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. अनेक प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरा, राजू मणियार, सतीश परदेशी, डाॅ.नितीन राठी, अनील बिर्ला,सुनील झवर,प्रविण झवर, डाॅ. अजय बियाणी,परेश बिर्ला,जगदीश बिर्ला,धीरज काबरा,सतिष काबरा, यश मणियार, रा.ति. काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील राठी, स. नं. झवर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील, रा.ही. जाजू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल चे प्राचार्य हैरी जॉर्ज उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक आर.एम. कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.