शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

एरंडोल (प्रतिनिधी) : शास्त्री फार्मसी महाविद्यालय येथे जागतिक फार्मसी दिनाचे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांच्या जन्म दिवसानिमित्त चे औचित्य साधून दि. 30 सप्टेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. शास्त्री महाविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर ऑफ इंडिया (APTI) च्या सहकार्याने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्येची देवता सरस्वती व धन्वंतरी पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. व्यासपीठावर डॉ. कुलदीप बनसोड, डॉ. प्रबोध सपकाळ तसेच प्रा. नितीन पाटील प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात डॉ. कुलदीप बनसोड यांनी आधुनिक फार्मसी शिक्षणातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, उद्योग–शिक्षण यांचा दुवा, संशोधनातील संधी तसेच शिक्षकांच्या व्यावसायिक प्रगती या विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये डॉ. प्रबोध सपकाळे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, तर शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील विभाग प्रमुख डॉ. चैताली पवार यांनी “द पावर ऑफ इनरमाइंड” या विषयावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यशाळेला राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयातील सुमारे ५५ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी व प्रा. योगेश्वरी लोहार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले.
या एकदिवसीय कार्यशाळेमुळे (Faculty Development Program) प्राध्यापक वर्गाला नवे ज्ञान, कौशल्यवृद्धी व प्रेरणा लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल बोरसे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.