*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एरंडोल येथे ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वितरण………!*

प्रतिनिधी एरंडोल – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व महसूल पंधरवाडा अंतर्गत तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यालयात ५० ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरूण माळी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप,नायब तहसीलदार संजय घुले, सुरेश देशमुख,सचिव विनायक कुलकर्णी, निंबा बडगुजर, नामदेव पाटील, भगवान महाजन, निंबा कुंभार, गुलाबराव पवार आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण भट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पुजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक संघटनेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नामदेव पाटील यांनी केले.संटनेचे अध्यक्ष अरूण माळी यांनी आभारप्रदर्शन केले.