जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोलमध्ये पुतळे सुशोभीकरण निधीबाबत सर्वपक्षीय बैठक

प्रतिनिधी एरंडोल – छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या ४० ते ५० लाख निधीच्या वापराबाबत चर्चा करण्यासाठी उद्या, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, विविध कार्यकारी सोसायटी, एरंडोल येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेने कोणालाही विश्वासात न घेता काम सुरू केल्याने ही बैठक बोलावली असून, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री देविदास महाजन, श्री शालिकभाऊ गायकवाड, श्री विजय अण्णा महाजन, डॉ. सुरेश पाटील व श्री जगदीश ठाकूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button