एरंडोल नगर पालिकेचे वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर.

प्रतिनिधी – एरंडोल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत आज दि.८/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता नगरपालिकेच्या कर्मवीर अभ्यासिका हॉल येथे प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड,नगर पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.सोडत विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून करण्यात आली.नगरपालिकेच्या एकूण ११ वॉर्डात २३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये प्रत्येकी २ जागा तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये ३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले.
प्रभाग क्रमांक १ मध्ये अ) भागात नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला) ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ मध्ये अ)अनुसूचित जमाती( महिला ) ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ)अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण ( महिला ) प्रभाग क्रमांक ४ मध्ये अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक ५ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ६ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ)सर्वसाधारण (महिला) ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ८ मध्ये अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक १० मध्ये अ)सर्वसाधारण (महिला) ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ११ मध्ये अ)सर्वसाधारण (महिला) ब)सर्वसाधारण (महिला) क) सर्वसाधारण
प्रमाणे सोडत काढण्यात आली.याप्रसंगी शेनफडू वाल्डे,मोहन चव्हाण,ईश्वर बिऱ्हाडे,शेख सांडू,जावेद मुजावर, ॲड.अहमद सैय्यद,विठ्ठल आंधळे,प्रमोद महाजन,निलेश परदेशी,संजय भदाणे,शाम जाधव,सुदर्शन महाजन,सचिन महाजन,अनिल महाजन,अतुल महाजन,ॲड.रघुनाथ महाजन,कलीम शेख,प्रवराज पाटील,नितीन महाजन,अभिजित पाटील,बबलु चौधरी, कृष्णा ओतारी,प्रा.आर.एस.पाटील, गोविंदा बिर्ला व राजकीय पक्षाचे नेते,सदस्य व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.सोडत काढण्याचे कामकाज कार्यालयीन अधीक्षक एस.आर.ठाकुर,हितेश जोगी व नगर पालिकेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.