जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक
श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड.

प्रतिनिधी – एरंडोल: येथील श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी चि. परीक्षित रवि भगत (इयत्ता ७ वी) याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अमितदादा पाटील यांनी परीक्षितचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. तसेच शाळेचे प्राचार्य श्री दिनानाथ पाटील सर, शेखर पाटील सर, क्रीडा शिक्षक आकाश नेटके सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षितला पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा व एरंडोल शहराचा अभिमान वाढला असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे.