एरंडोल महसूल विभागाने केली ४० ब्रास अवैध वाळू जप्त.

प्रतिनिधी – एरंडोल महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय एरंडोल यांच्या दोन पथकाने दोन ठिकाणावरून ४० अवैध वाळू जप्त केली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार एरंडोल तहसील कार्यालय यांच्या दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन वाहतूक बाबत कारवाई केली.यात मौजे दापोरी शिवारात 25 ब्रास वाळू साठा जप्त केला व वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी केनी व तारजप्त केले तसेच
मौजे हणमंतखेडे सिम येथे 15 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला.सदर कारवाई पथकात तहसीलदार प्रदीप पाटील,
निवासी नायब तहसीलदार संजय घुले ,मंडळ अधिकारी उदय निंबाळकर,मनोज शिंपी,दीपक ठोंबरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी लोंढे,वैभव पठे,रोहित इंगळे,नितीन पाटील,अमर भिंगारे,मयूर कुलकर्णी, रविराज पाटील,श्रीकांत कासुंदे,पार्थ यादव, मनोज सोनवणे,सागर कोळी,संदीप पाटील,वीरेंद्र पालवे,राहुल अहिरे,प्रशांत निकम,सुधीर मोरे,सुदर्शन पवार,तसेच महसूल सेवक अमोल पाटील,प्रदीप पाटील,भूषण म्हस्के,मधुकर पाटील, पोलीस पाटील उत्राण तिवारी ,पोलीस पाटील रवंजे बु ,खर्ची राजेंद्र पाटील यांनी कारवाई केली.