जळगावमहाराष्ट्र
शहरातील मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी दिले निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील गांधीपुरा भागातील वखार परिसरातील कृष्णा महेंद्र पाटील ( साडेतिन वर्ष ) या मुलाला कुत्र्याने चावा घेतला.त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी एरंडोल नगर पालिकेला निवेदन दिले.
निवेदनात आमच्या वॉर्ड क्रमांक ७ मध्ये कुत्रे व डुकरांचा संचार वाढलेला असून नुकताच वार्डातील कृष्णा महेंद्र पाटील या साडेतीन वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतला तसेच याठिकाणी डुकरांचा देखील संचार मोठ्याप्रमाणात झाला असल्याचे म्हटले असून त्यांचा नगर पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा अशी विनंती केली आहे.निवेदनावर धनंजय खैरनार,विजय नाईक,भैया पाटील,नितीन जोहरी,धनराज पाटील व असंख्य रहिवाशांच्या सह्या आहेत.