विखरण गणात युवकांचा लाडका नेता म्हणून ईश्वर भाऊ सोनार चर्चेत

प्रतिनिधी – एरंडोल : विखरण गणात सध्या युवकांच्या मनात एकच नाव चर्चेत आहे — ईश्वर भाऊ सोनार. समाजकारण आणि लोकसेवा या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली ओळख आज सर्व स्तरांवर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः युवकवर्गात त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात आहे.
ईश्वर भाऊ सोनार यांनी गेल्या काही वर्षांपासून पंचक्रोशीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. गरजू कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, आरोग्य शिबिरे, तसेच सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमा यामधून त्यांनी समाजात वेगळी छाप पाडली आहे.
नेहमी मदतीसाठी तत्पर राहण्याची वृत्ती आणि लोकांशी जिव्हाळ्याने वागण्याचा स्वभाव यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले आहेत. कोणत्याही सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे आणि सर्वसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध असणारे नेते म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे.
स्थानिक युवकांनी सांगितले की, “ईश्वर भाऊ सोनार हे खऱ्या अर्थाने लोकांचे माणूस आहेत. कोणत्याही समस्येत ते त्वरित मदतीला धावून येतात. त्यामुळेच ते आमच्या मनातील खरे नेता ठरले आहेत.”
विखरण गणातील युवक व नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात ईश्वर भाऊ सोनार यांच्या नेतृत्वाखाली समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.