वार्ड क्रमांक एक मधून ओबीसी महिला राखीव जागेसाठी मीनाक्षी पाटील हे उमेदवारी करणार

एरंडोल (प्रतिनिधी): येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून ओबीसी महिला राखीव जागेसाठी मीनाक्षी चंद्रकांत पाटील या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉलनी परिसरातील विकासकामे, आरोग्य आणि स्वच्छता यांवर विशेष लक्ष केंद्रित करून मीनाक्षी पाटील यांनी आपल्या वॉर्डातील नागरिकांसाठी ठोस आराखडा तयार केला आहे. काँक्रीट रस्ते, सजावटी ड्रेनेज गटारी, ओपन प्लेसचे सौंदर्यीकरण, तसेच परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
मीनाक्षी पाटील म्हणाल्या, “जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करून स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील वार्ड उभारणे हेच आमचे ध्येय आहे. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील.”
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “त्या प्रामाणिक, कार्यक्षम आणि जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवार आहेत. वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पर्याय ठरतील,” असे मत व्यक्त केले आहे.
गेल्या काही काळापासून रस्ते, पाणी व गटार व्यवस्थेबाबत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्या दूर करण्यासाठी मीनाक्षी पाटील यांनी दीर्घकालीन नियोजन केले असून, नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेत आहेत.
जनतेच्या सहकार्याने “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वार्ड” उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे