विशेष लेकरांसोबत दिवाळीचा आनंद – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचा उपक्रम”

प्रतिनिधी : एरंडोल – सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन तर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून सहवास प्रौढ मतिमंद मुलांच्या विना-अनुदानित निवासी पुनर्वसन संस्थेत (वनकोठा ता. एरंडोल, जि. जळगाव) आनंदसोहळा साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत संस्थेतील सर्व विशेष मुलांना दिवाळी फराळ वाटप, बेडशीट, ब्लॅंकेट तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष मा. जितेंद्र पाटील यांनी स्वतः संस्थेला भेट देत या विशेष मुलांशी संवाद साधला व त्यांना आत्मीयतेने भेट दिली. त्यांच्या मातोश्री सौ. सरोजबाई पाटील यांनीही उपस्थित राहून संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
फाउंडेशनचे संचालक व पदाधिकारी यांनी सहवास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संस्थेच्या गरजांबाबत माहिती घेतली. ग्रामीण भागातील संस्थांना अशा सामाजिक उपक्रमांचा आधार लाभल्यास विशेष मुलांचे जीवन अधिक सुसह्य होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख आनंद श्रीराम सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विजुभाऊ ठाकूर, सौ. दर्शना ठाकूर, मुरली भाऊ, संजय भाऊ भदाणे, संजू भाऊ पाटील (नागदूली), साई चौधरी, ओम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सहवास संस्थेचे पदाधिकारी यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. समाजहितासाठी कार्यरत असलेले हे फाउंडेशन आगामी काळातही असेच उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



