क्राईमजळगावमहाराष्ट्र

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड.

प्रतिनिधी अमळनेर : झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव ,एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळुन २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
       पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की टाकरखेडा शिवारातील कंडारी  रस्त्यावरील  गट १८० नम्बर मधील समाधान धर्मा पाटील पाटील यांच्या शेतात पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर ,  संदीप धनगर ,विनोद संदानशिव , अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे , गणेश पाटील ,उज्वलकुमार म्हस्के , प्रशांत पाटील,चरणदास पाटील,  उदय बोरसे , राहुल पाटील,नरेश बडगुजर यांच्यासह छापा टाकला असता तेथे समाधान धर्मा पाटील वय ४० रा टाकरखेडा , पुंडलिक दोधु पाटील वय ४९ रा लहान माळी वाडा धरणगाव , रवींद्र दशरथ महाजन वय ३३ नागोबा मढी एरंडोल , चेतन उर्फ नाना ज्ञानेश्वर महाजन वय २६ नागोबा मढी एरंडोल , धनराज दिलीप पाटील वय ३५ रा कुंभारटेक  तेलीवाडा अमळनेर , सैनिक अशोक कोठारी वय ४०  रा वडचौक , पंढरीनाथ धनलाल माळी वय ५५ रा मोठा माळीवाडा धरणगाव , पुनमचंद  गोपीनाथ बाविस्कर वय ४० रा माळीवाडा धरणगाव , किशन किरण ओतारी वय २५ रा कुंभारटेक अमळनेर , केशव किरण पाटील वय ३५ रा निशाणे ता धरणगाव , किरण गुलाब पाटील वय ४२ रा लोणे ता अमळनेर , जितेंद्र रघुनाथ कोळी वय ४३ रा टाकरखेडा याना पकडून त्यांच्या जवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले. सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button