राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या अपुर्णावस्थेतील कामासंदर्भात नागरी कृती समितीकडून खासदार स्मिता वाघ यांना साकडे…..!

प्रतिनिधी एरंडोल – शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणात अपुर्ण असलेल्या कामांमुळे बेशिस्त वाहतूक व नागरिकांची असुरक्षितता वाढल्याप्रकरणी येथील महामार्ग चौपदरीकरण नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार स्मिता वाघ यांची मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी भेट घेऊन अपुर्णावस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले.चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या अडचणी व समस्यांबाबत शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.नामदार नितीन गडकरी यांच्या सोबत नहीचे अधिकारी व नागरी कृती समितीचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले.
नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी आमदार महेंद्रसिंग पाटील,गोरख चौधरी, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर, अतुल महाजन, कैलास महाजन व पंकज महाजन यांचा समावेश होता.
कासोदा फाटा ( अमळनेर नाका )नजीक महामार्गावर उड्डाण पूल,त्या ठिकाणापासून दत्तमंदिरापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते पथदिवे व गटारी,बी एस एन एल कार्यालयाजवळ अंडरपास तयार करणे, शिवाजी नगर लगत व गणेश नगर लगत अपुर्णावस्थेतील गटारींची कामे पूर्ण करणे.पिंपळकोठा बु.येथे अंडरपास किंवा उड्डाण पूल तयार करणे.इत्यादी कामे लवकरात लवकर व्हावीत यासाठी खासदार स्मिता वाघ यांना नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले आहे.