जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल येथे कानबाई मित्र मंडळातर्फे कानबाई मातेच्या वह्या गायनाने नववर्षाचे स्वागत ….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे कानबाई मित्र मंडळातर्फे ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री मरिमाता मंदिरात कानबाई मातेच्या वह्या ( भजन ) गायनाने २०२५ या नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
       मंडळाचे अध्यक्ष भिका चौधरी, उपाध्यक्ष आधार माळी, सदस्य ओंकार चौधरी, अशोक चौधरी,अजय महाजन,चिंतामण चौधरी, ईश्वर मराठे,विक्रम पांचाळ,पंकज धनगर, भगवान बडगुजर, दिलीप बडगुजर, आत्माराम पाटील, प्रल्हाद मराठे, तुषार चौधरी यांनी भजन गायन कार्यक्रमात सहभाग घेतला.मरिमाता मंदिराचे पुजारी यशवंत बुंदेले,मयुर बुंदेले यांचे सहकार्य लाभले.यावेळी सर्वांना नववर्ष आरोग्यदायी व सुखसमृद्धीचे जावो अशी प्रार्थना व भजन कानबाई माता व मरिमातेच्या चरणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button