जळगावधार्मिकमहाराष्ट्र
*एरंडोल येथे देशमुख मढीवर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्साहात प्रारंभ…….!*

प्रतिनिधी एरंडोल – श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे देशमुख मढीवर १६ जुलै २०२५ रोजी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला.पहिल्या दिवशी ह.भ.प.सावता महाराज मोहाडीकर यांच्या किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.दुसऱ्या दिवशी १७ जुलै २०२५ रोजी प्रा.तथा ह.भ.प.सी.एस.पाटील यांच्या किर्तनात भक्तगण भक्तीरसात चिंब झाले.१८ जुलै २०२५ पासून अनेक नामांकीत किर्तनकारांची किर्तने होणार आहेत.
२३ जुलै २०२५ रोजी सकाळी काल्याचे किर्तन त्यानंतर दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत संत सावता महाराज यांची पालखी मिरवणूक शहरातून निघणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देशमुख मढी पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद देशमुख, सुरेश देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.