जळगावताज्या बातम्यादेश-विदेशराज्य

खामगांव मध्ये घडले प्रामाणिकपणाचे दर्शन…

विशेष प्रतिनिधी खामगांव :- येथील एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव हे शहरातील बारादरी परिसरात दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी एका जखमी असलेल्या गौ मातेला उपचार करण्यासाठी तिचा रिस्क्यू करत असतांना त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल अंदाजे 24,500 रुपये किंमतिचा असलेला मोबाईल फोन रस्त्यावर पडला तो मोबाईल फोन राजु भारत सावंग राहणार दालफैल यांना सापडला असता त्यांनी तो फोन आपल्या सोबत नेला स्विच ऑफ न करता त्यांनी सुरू ठेवला यादव यांच्या फोनवर अभिषेक देशमुख, व सौरभ पाटील, कुंदन साबळेयांनी संपर्क साधला असता राजु सावंग यांना माहिती दिली तुमच्या जवळ जो फोन आहे तो सुरज यांचा आहे. अशी माहिती देताच सावंग यांनी प्रामाणिक पणा दाखवून सापडलेला मोबाईल फोन सुरज यांच्या कडे नेऊन दिला. सावंग या युवकाच्या प्रामाणिक पणाचे कौतुक एकनिष्ठा फाउंडेशन कडून  त्याचे आभार सुद्धा मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button