शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तर्फे सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन
प्रतिनिधी – येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या परंपरेनुसार सावित्रीबाईंच्या लेकींना म्हणजे त्याच महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला प्राध्यापिकेला पूजनाचा मान देण्यात येतो. त्याचप्रमाणे यंदाही महाविद्यालयातील महिला प्राध्यापक श्रद्धा शिवदे यांना प्रतिमा पूजनाचा मान मिळाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री तसेच डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी वंचित – उपेक्षित तसेच स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याचा बहुमान प्राप्त करून देण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा होता असे महत्त्वाचे प्रतिपादन त्यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी तर आभार प्रा. दिग्विजय पाटील यांनी केले. प्रसंगी प्रा. सतीश ब्राह्मने,प्रा. सुमेश पाटील, प्रा. चंद्रभान पाटील,प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. मयुरी पाटील, प्रा. रोशनी पाटील, प्रा. मीना मोरे, विवेक पाटील, विंचुरकर सर, भावेश बडगुजर तसेच नरेंद्र पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.