क्राईमजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
एरंडोल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय महिला ठार….!

प्रतिनिधी एरंडोल – भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सुनीता नामक वय ४० वर्षे महिलेला धडक देऊन झालेल्या अपघातात ती जागीच गतप्राण झाली.ही दुर्घटना ३ जानेवारी २०२५ रोजी भल्या पहाटे पळासदळ फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडली.या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर मृत महिला ही त्या परिसरात नेहमी फिरत होती.