एरंडोल येथील आयुष मालपुरे झाला सी.ए.
प्रतिनिधी एरंडोल – येथील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा सी.ए.झाला आहे.
श्रीकृपा जिनिंग प्रायव्हेट लिमिटेड एरंडोल येथे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या गोविंद मालपुरे याचा सुपुत्र आयुष गोविंद मालपुरे याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत वयाच्या २२ व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशामुळे संपूर्ण मालपुरे कुटुंबाचा सन्मान वाढला आहे.
याप्रसंगी बोलतांना आयुषने त्याच्या यशामध्ये त्यांच्या स्वर्गीय आजोबा गोपाल मालपुरे यांची शिकवण आणि संस्कार, तसेच काका बिपीन मालपुरे व रोशन मालपुरे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे सांगितले तसेच त्याच्या आयुषने आपल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हा मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशासाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.मालपुरे कुटुंबाचा हा गौरवपूर्ण क्षण इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.आयुषचे संपूर्ण मालपुरे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या वतीने कौतुक व शुभेच्छा दिल्या आहेत.