निसर्गसखी सौ. मंगला रोकडे विश्वस्तरीय आंतरराष्ट्रीय काव्य जागर सन्मान तसेच मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळ शास्त्री जांभेकर सन्मानाने सन्मानित…..

प्रतिनिधी – एरंडोल येथिल निसर्गसखी कवियत्री सौ.मंगला मधुकर रोकडे यांना नविन वर्षाच्या प्रारंभीच देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत जगातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल पुणे २०२५ द्वारे दि.२जाने.२०२५ रोजी सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम पत्रकार भवन शेजारी नव्या पेठेतील एस एम जोशी फा ऊंडेशनच्या सभागृहात संपन्न झाला.६०० कविंचा हा काव्य जागर दि. २ ते ५ जानेवारीपर्यंत चालू होता. सौ. मंगलाताई रोकडे यांच्यासह एरंडोल येथिल कवियत्री मनिषा रघुवंशी तसेच म्हसावद येथिल प्रा. विमलताई वाणी ह्या सुध्दा सहभागी होत्या.
लगेचच दि.६जाने.२०२५ रोजी दुसरा सन्मान सौ. मंगलाताईना ऑनलाईन स्वरूपात प्राप्त झाला. मराठी पत्रकारितेचे जनक बाळ शास्त्री जांभेकर सन्मानाने बदलापूर जि. ठाणे येथिल जनजागृती सेवा संस्थेद्वारे हा सन्मान मंगलाताई रोकडे यांना प्राप्त झाला. संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या त्या मनस्वी आभारी आहेत. धुळे जळगांव तसेच एरंडोल शहरांसह महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनांचे वर्षाव होत आहे.
—————————