क्राईमजळगाव

४० हजारांची लाच घेताना महिला सरपंच,पती,मुलासह, सेतू चालक एसीबीच्या जाळ्यात.

प्रतिनिधी पारोळा – जगभरातील आर्थिक आणि सामाजिक विकासात भ्रष्टाचाराच्या घटना घडत असताना पारोळा तालुक्यातून मोठी बातमी समोर  आली आहे. पारोळा तालुक्यातील मेहु गावातील  महिला सरपंच, तिचा पती, मुलगा व  सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना 40 हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.याबाबत अधिक माहिती अशी की, मेहु गावात 7 लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी 2023 मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली. यावेळी सरपंचांनी 7 लाख रुपयांपैकी 4 लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी 70 हजार रुपयांची लाच मागितली होती.

     सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती 40 हजार रुपयांवर आणली. त्यानंतर सरपंचांच्या मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाधान पाटील यांनी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

ला.प्र वि. नाशिक  पोलिस अधीक्षक मॅडम  शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि जळगांव पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पी.एस.आय दिनेशसिंग पाटील, पी.एस.आय सुरेश पाटील, पो.कॉ राकेश दुसाने, पो.कॉ अमोल सुर्यवंशी या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button