जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रराज्य

मनोज भाऊ मित्र परिवार तर्फे पत्रकार दिनानिमित्त  पत्रकारांचा सत्कार….

प्रतिनिधी – एरंडोल येथे  मनोज भाऊ मित्र परिवार तर्फे पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बीएस चौधरी सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पत्रकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन  करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले व सरस्वती पूजन करण्यात आले.
    मा. नगरसेवक मनोज पाटील यांनी आपले प्रास्ताविकात  व्यक्त करताना  लोकशाहीच्या जडणघडणी मध्ये पत्रकारांची भूमिका मोलाची असुन समाजप्रबोधन व जनजागृती करून समाजास व इतर क्षेत्राना योग्य दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगितले , एरंडोल येथील पत्रकारांना आपले हक्काचे व्यासपीठ म्हणून पत्रकार भवन  उभारण्यात माझे नेहमीच सहकार्य राहील व त्यासाठी लागणार्या निधी उपलब्ध करण्याची जवाबदारी माझी राहील असे प्रतीपादन केले.
       बी एस चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोज भाऊ यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान कसे निर्माण केले याबद्दल सविस्तर सांगितले व भविष्यात नक्कीच आपण नगराध्यक्ष व्हाल व आपल्या हातून एरंडोल चा विकास होईल अश्या शुभेच्छा सर्व पत्रकारांतर्फे दिल्या.
    यावेळी  आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद, शरद महाजन, कैलास महाजन, रतीलाल पाटील, सुधीर शिरसाठ , नितीन ठक्कर , कुंदन ठाकुर,  राजधर महाजन, स्वप्निल बोरसे ,  पंकज महाजन , तुषार शिंपी , उमेश महाजन , चंद्रभान पाटील , प्रमोद चौधरी , देविदास सोनवणे ,दिनेश चव्हाण , नितीन पाटील ( बापूजी ) आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन भानुदास आरखे यांनी केले  व आभार प्रदर्शन मयूर जाधव यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button