जळगावमहाराष्ट्र

एरंडोलल शहरवासियांना आवश्यक सुविधा देण्यासाठी कटीबध्द-अमोल बागुल

सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात न.पा. प्रशासक अमोल बागुल यांनी दिली ग्वाही
एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल नपाचा कारभार (प्रशासकीय) सुरळीत चालवून शहरवासियांना आवश्यक सुविधा देण्यासाठीच कटीबध्द असल्याची ग्वाही नपाचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांनी ज्येष्ठ नागरीकांना दिली.
         एरंडोलला सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात विशेष सत्कारप्रसंगी प्रशासक अमोल बागुल बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी यांनी बागुल यांचा सत्कार केला. यावेळी संचालकांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       यावेळी ज्येष्ठ संचालक प्रा. शिवाजीराव अहिरराव, नामदेवराव पाटील यांनी शहरवासियांना भेडसावणार्‍या समस्या, पावसाळ्यातील रस्ते, गटारी, अंजनी नदी बाबतच्या तक्रारींची माहिती दिली. यावेळी नपाचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांनी नागरीकांना ग्वाही देवून आश्वासन दिले की नागरीकांना मुलभूत सुविधा देणे ही आमची प्रमुख जबाबदारी आणि कर्तव्यच आहे. तक्रारींचे निरसन करून सुविधा देण्यासाठीच आमची नेमणूक असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
एरंडोलला नपातर्फे देण्यात येणार्‍या सुविधा पुरेशा नसून पावसाळ्यात मरणयातना सहन कराव्या लागतात. त्यात ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रविंद्र लाळगे, नामदेेवराव पाटील आदींनी संघर्ष समितीची (नोंदणीकृत) देखील स्थापना केली आहे. सर्व तक्रारींची दखल घेतली असून सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागरीकांनी खोट्या अफवांवर विश्वासू ठेवू नये, ज्येष्ठ नागरीक अथवा संघर्ष समिती सदस्यांनी कार्यालयात येवून सविस्तर चचा करण्याचे देखील जष्ठ नागरीकांना आवाहन केले आहे. प्रशासक अमोंल बागुल यांनी मनमोळपणाने चर्चा केली. त्याबद्दल शहरवासियांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी निंबा बडगुजर यांनी केले. तर आभारप्रदर्शन नामदेवराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेने होवून समारोप संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button