एरंडोल पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जणांवर केली कारवाई.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील रवंजे खु. येथील महादेव मंदिराजवळ काही लोक पत्त्यांचाजुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने एरंडोल पोलिसांनी धाड टाकून नऊ जणांवर कारवाई करून २ हजार ७० रुपये व खेळाचे साहित्य जप्त करण्यात आले.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील रवंजे खु. येथे महादेव मंदिरा जवळ युवराज निळकंठ पाटील यांच्या घरासमोर मोकळ्या जागी पत्ता जुगाराच्या खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती असल्याची माहिती मिळाल्याने पो.हे.कॉ अनिल पाटील, मुकेश अमोदकर,पो.ना.संदिप पाटील, सचिन पाटील,पो. कॉ.अमोल भोसले,दिपक अहिरे,आकाश शिंपी,चालक पो.कॉ.भाऊसाहेब मिस्त्री यांनी धाड टाकून पंचा समक्ष पत्ते खेळणारे ज्ञानेश्वर सुखदेव कुंभार वय ४०, दीपक हिम्मतराव पाटील वय ३९,योगेश भास्कर सोनवणे वय ४१, निखिल अशोक नन्नावरे वय २९, रामलाल सुभान बिल वय ३५, बळीराम सुरेश पाटील व ४०, युवराज निळकंठ पाटील वय ६२, गुलाब दैवत कुंभार वय ४०, प्रविण उत्तम कुंभार वय ३४ सर्व राहणार रवंजे खुर्द यांच्यावर कारवाई करून अंग झडती घेऊन रोख रकमेसह ३४० रुपये रोख व ५२ पत्त्यांचे दोन कॅट असे साहित्य जप्त करण्यात आले. एरंडोल पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल युवराज भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.