जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव…..!

प्रतिनिधी एरंडोल – महसूल प्रशासनाअंतर्गत सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांच्याकडून सन्मानपत्र प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांची कार्यक्षमता व कामातील पारदर्शकता ही सर्व सामान्य नागरिकांना प्रशासनाबाबतचा विश्वास दृढ करणारी ठरते असे जाणकारांचे मत आहे.


       अर्धन्यायीक प्रकरणे व अंतर्गत लेखा परीक्षण क्र.१ ( जमा ) प्रलंबित परिच्छेद,निर्गतीकरणे या विषयामध्ये उल्लेखनीय कामकाज करण्याबद्दल मनीष कुमार गायकवाड हे गौरवास पात्र ठरले.तसेच सर्व महसूल विषयक बाबींमध्ये द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचेसुध्दा ते मानकरी ठरले.
       गायकवाड यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button