जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमपीयुएच नाडियादच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने
रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे किडनी सुरक्षा जनजागृती शिबीर

प्रतिनिधी जळगाव :-  रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने नाडियाद येथील सुप्रसिद्ध मुलजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटल (एमपीयूएच) यांच्या संयुक्त विद्यमाने किडनी आजार या विषयावर ‘किडनी सुरक्षा जनजागृती शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. ज्यामध्ये किडनीशी संबंधित सर्व लहान-मोठ्या आजारांची लक्षणे, त्यांची कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग समजावून सांगितले जाणार आहेत. शिबिरात सर्वांसाठी प्रवेश खुला व नि:शुल्क असून किडनीच्या समस्येमुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शन हवे असलेल्या रुग्णांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा.

माहिती देताना रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुजरातमधील नाडियाद येथील मुलजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्टिपल (एमपीयूएच) मधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम शनिवार, दि. 18 जानेवारी 2025 रोजी शहरातील महाबळ परिसरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 12 यादरम्यान ‘किडनी सुरक्षा जनजागृती शिबीर’ मध्ये मुलजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटलमधील यूरोलॉजी विभागाचे प्रमुख ज्येष्ठ अध्यक्ष डॉ.रविन्द्र सबनीस, कन्सल्टंट युरोलॉजी आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.अभिजीत पाटील आणि कन्सल्टंट नेफ्रोलॉजी आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ.अभिजीत कोन्नूर व टीम द्वारे रुग्णांना मार्गदर्शन केले जाईल.

या महत्त्वाच्या किडनी आरोग्य जनजागृती शिबीरात सहभागी होण्यासाठी कृपया 9924653504 किंवा 9429412612 या संपर्क क्रमांकावर रुग्णांनी नाव नोंदणी करावी. वर्ष 1978 पासून सार्वजनिक सेवेसाठी समर्पित डॉ.व्ही.व्ही.देसाई मार्ग, नाडियाद (गुजरात) येथील मुलजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटल (एमपीयूएच) च्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही किडनी विकारांच्या आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी देशभरात ओळखली जाते. या किडनी सुरक्षा जनजागृती शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे प्रेसिडेंट रो.विनीत जोशी, सेक्रेटरी रो.तुषार तोतला व रो.भद्रेश शाह, प्रोजेक्ट चेअरमन रो.डॉ.मिलींद जोशी व को-चेअरमन रो.सई नेमाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button