मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर यांची एरंडोल आगारा ला सदिच्छा भेट

प्रतिनिधी – रापम च्या मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य कामगार अधिकारी राजेशजी कोनवडेकर यांनी आज एरंडोल आगाराला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे समवेत जळगांव चे कामगार अधिकारी कमलेश भावसार हे देखील उपस्थित होते आगारात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आगार व्यवस्थापक यांचे समवेत कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रूम ची पाहणी करून व उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व योग्य त्या सूचना देखील एरंडोल प्रशासना ला दिल्यात महिला कर्मचारी यांच्यासोबत देखील संवाद साधून त्यांच्या विश्रांती गृहाच्या सुविधांबाबत देखील माहिती जाणून घेतली यानंतर आगार व्यवस्थापक यांचे दालनास भेट दिली यावेळी आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी राजेशजी कोनवडेकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करीत सत्कार केला तसेस कमलेश भावसार यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला वाहक किशोर मोराणकर यांनी प्रास्ताविक करीत मुख्य कामगार अधिकारी यांचा परिचय करून देत मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य कामगार अधिकारी यांनी एरंडोल सारख्या छोट्या आगाराला प्रत्यक्षात भेट देऊन आत्मीयतेने कर्मचारी वर्गाच्या समस्या जाणून घेत मनमोकळे पणाने संवाद साधल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले कोनवडेकर साहेब यांनी देखील सुरक्षितता सप्ताह असेल,विना अपघात सेवा असेल क चांगल्या दर्जाची प्रवासी सेवा असेल याबाबतीत मार्गदर्शन करून एरंडोल आगार प्रमुख विजय पाटील यांनी आगाराच्या वतीने सत्कार करून मला उपकृत केली असल्याची भावना बोलून दाखवली व अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून सांघिक वृत्तीने उत्पन्न वाढी सह सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करावा अशी अपेक्षा व्यक्त करून कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्यात यावेळी सतीश महाजन,ज्ञानेशवर चौधरी,राजेश वाडीले,राहुल पाटील,मुकेश ठाकूर,रवी पाटील ,विलास पाटील,दौलत चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.