अपघातजळगावमहाराष्ट्र

निम येथे  दोन शाळकरी मुलांचा नदीत पोहतांना बुडून मृत्यू

अमळनेर प्रतिनिधी:-निम ता अमळनेर येथे  आज ता. 2 रोजी तापी नदीत दुपारी पोहायला गेले असतांना  दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. चेतन अरुण सुतार वय (९) ,हरीश बाळू पाटील वय(१२) अशी मृत मुलांची नावे असून चेतन अरुण सुतार ह्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. तो शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे तर दुसरा मृतदेह शोधण्याचे सुरु आहे. मृतदेह शोधण्याचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत चालू  सुरु होते.  मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान,संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे .
       दरम्यान दोघेही मुले खेळायला गेले असतील यामुळे सायंकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता चेतन सुतार हा पाण्यात तरंगताना दिसला. दोघांनी पोहण्यासाठी गेले असताना काठावर कपडे काढून पोहत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे गावात सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button