माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन यांचे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

प्रतिनिधी एरंडोल- येथील उ.बा.ठा गटाचे माझी जि प सदस्य नानाभाऊ पोपट महाजन यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह मुंबई येथे भाजपाच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे उ.बा.ठा ला मोठा धक्का मानला जात आहे यापूर्वी महाजन हे पंधरा वर्षापर्यंत भाजपा पक्षात होते विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे आपण त्यावेळी उ.बा.ठा चा राजीनामा दिला होता असे महाजन यांनी सांगितले.
नानाभाऊ महाजन यांच्या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी ना.गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण, डॉक्टर राधेश्याम चौधरी भाजपा हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मोहन लहू सोनवणे, समाधान चिंतामण पाटील, मगसूद मायुम पटेल, गोपाल नारायण महाजन, नामदेव आधार महाजन, प्रदीप भिकन देशमुख, शिवाजी चिंतामण कोळी, दिलीप चखाले, ज्ञानेश्वर महादू बडगुजर, अशोक राजाराम बडगुजर, दीपक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या….