जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल येथे श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने आमदार अमोल पाटील यांचा सत्कार…

प्रतिनिधी एरंडोल :-  मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा सत्कार येथील महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आला.
  सर्वप्रथम आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीस पुष्पहार व विडा समर्पित करण्यात आला. मंदिराच्या व्यवस्थापक तपस्विनी शैलाताई पंजाबी व प्राचीताई बिडकर यांनी श्रीफळ देऊन आमदार पाटील यांना शुभाशीर्वाद दिले.
  यानंतर आमदार अमोल पाटील यांचा श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या व उपदेशी बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रेमराज पळशीकर होते. याप्रसंगी बोलताना आमदार अमोल पाटील यांनी मागील काळात तत्कालीन आमदार चिमणराव पाटील यांनी रामचंद्र नगर परिसरात अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून निडणुकांपूर्वीच श्रीकृष्ण मंदिरास देखील ५० लक्ष रुपयांचा भरघोस निधी दिल्याची माहिती दिली. जनतेने मोठे मताधिक्य दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले, तसेच आपली जबाबदारी वाढली असून आगामी काळात संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. द्वेषाचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करण्यावर आपला भर राहील, मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले तत्वज्ञान हे मानवी कल्याणाचा प्रमुख आधार असून ते लोकांपर्यत पोहोचविणाऱ्या मठ मंदिरांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव भिका देवरे यांनी मानले.
    याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकुर, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, शहर संघटक मयूर महाजन, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आंधळे, पुंडलिक पवार, युवासेनेचे शहरप्रमुख कृष्णा ओतारी, गुड्डू जोहरी आदी मान्यवर उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर सोनार, प्रमोद पाटील, किशोर महाजन, ईश्वर पाटील, रवींद्र पाटील, विजय सोनार, मनोज चौधरी, एस आर पाटील, किशोर शेलार, सुधाकर हिरपुडे, राजू बिर्ला, अशोक चौधरी, अशोक जावळे, अनिल महाजन, शिवाजी मराठे, संतोष वंजारी, डॉ कृष्णराज पळशीकर, डॉ योगीराज पळशीकर, गोपाल सोनार, जयेश सोनार, दिनेश पाटील, हर्षल सोनार, उमेश चौधरी, भटू सोनार, प्रशांत पाटील, मयूर महाजन, हर्षल महाजन, दर्शिल महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button