जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

कासोदा येथे महिला व मुलींसाठी प्रबोधन करणारे व बापाची ओळख करून देणारे काळजाला भिडणारे  वसंत हंकारे यांचे व्याख्यान.        

विशेष प्रतिनिधी कासोदा – येथे दिनांक १७ जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता कस्तुरीबाई नंदाराम मंत्री माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर काळजाला भिडणारे ,समाज प्रबोधनात्मक अशा व्याख्यानाचे भव्य दिव्य आयोजन कासोदा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
      कासोदा व परिसरातील सर्व माध्यमिक विद्यालययांचे आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी , विद्यार्थिनी त्यांचे आई-वडील यांना एकत्र आणून हे प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कासोदा ग्रामस्थ, कासोदा पोलीस स्टेशन, पत्रकार, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ,विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक संस्था ,इत्यादींच्या सहकार्यातून जनजागृती च्या उद्देशाने व समुपदेशनाचे उद्देशाने श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .सध्याच्या परिस्थितीत येणाऱ्या तरुण पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी, श्रम करणाऱ्या आपल्या वडिलांचे व आईचे महत्व पटवून देण्यासाठी त्यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडून आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे .कार्यक्रमाचे व्यापक स्वरूप लक्षात घेता आयोजकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात येत आहे .सर्व शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यासोबत शिक्षक वृंद व शक्य असेल त्या आई-वडिलांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. “बाप समजून घेताना “या विषयावर श्री हंकारे यांचे अनेक व्याख्यान झालेली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .आपल्या जीवनात प्रत्येकासाठी कष्ट करून आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी भूमिका बजावणारे आई-वडील आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव या व्याख्यानातून होणार आहे. तेव्हा पंचक्रोशीतील सर्व  माध्यमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सोबत आई-वडील यांनी उपस्थितीचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. ‘न भूतो न भविष्यती ‘असा हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे .तो आपण चुकवू नये किंवा भविष्यात पश्चाताप होऊ नये म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button