एकनिष्ठा फाउंडेशनला सेवारत्न पुरस्कार..
विशेष प्रतिनिधी खामगांव :- दरभंगा बिहार येथे दोन दिवसीय राष्ट्रीय रक्तदाता संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संम्मेलनामध्ये भारत देश नेपालसह २१५ संस्थानी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम शतकवीर रक्तदात्यांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी दिप प्रज्वलन करून. कार्यक्रमाचे थाटात उदघाट्न झाले या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या देशातील सर्व संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांची कार्यशाळा समर्पण मिथिलाचे राष्ट्रीय महासचिव दिपक कुमार महथा, राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश प्रसाद , कोषाध्यक्ष रंजीत श्रीवास्तव , राकेश रंजन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली तसेच दिनांक १२ जानेवारी २०२५ ला सांस्कृतिक नृत्याचे प्रसारण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन समर्पण मिथिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मृदुल कुमार शुक्ला (वरिष्ठ भाजपा नेता दरभंगा बिहार) यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिराचे संपन्न झाले या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष गोपाल ईटीवाले यांनी मिथिला दरभंगा सिता मातेच्या पावन भूमीवर आपल्या जिवनातील १६ वा दुर्मिळ रक्तगट🆎 निगेवटिव रक्तदान केले या रक्तदान शिबिरात सर्वात जास्त महाराष्ट्रच्या रक्तदात्यांनी रक्तदान करून एक दा पुन्हा सिद्ध करून दिले रक्तदान क्षेत्रात महाराष्ट्र १ नंबर ला आहे. महाराष्ट्रात एकनिष्ठा फाउंडेशन करत असलेल्या गौ – सेवा , रक्तसेवा , रुग्णसेवा कार्याची प्रशंसा करत डॉ. मृदुल कुमार शुक्ला , डॉ. सौ. गुंजन त्रिवेदी यांनी दलान रिजार्ट हॉटेल येथे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव , खामगांव तालुका अध्यक्ष गोपाल ईटीवाले यांना राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार हारफुल मालार्पण शिल्ड प्रमाणपत्र लाल दुपट्टा देऊन सम्मान करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.